🔼आपण यांना ओळखता का ?🔼
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
🔹उद्देश :- दिलेल्या वाक्यातील आशयानुसार
शब्द निवडून लिहिणे.
🔹सूचना :- हा खेळ कितीही मुलांना खेळता
येईल. वेळ१५ मिनिटे. वाक्याच्या संख्ये-
इतकीच मुले असावीत. प्रत्येक मुलाने खालील-
प्रमाणे वैशिष्ट्ये असलेल्या पशूचे किंवा पक्ष्याचे
नाव त्या त्या वाक्यसमोर लिहावे. वेळ :वैशिष्ट्यां
-करिता दिलेल्या वाक्यांना अनुसरून ठेवावा.
जास्तीत जास्त नावे ओळखणारा जिंकेल.
(१) हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
(२) हा झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो.
(३)सुबक घरटे बनवण्यासाठी ही प्रसिद्ध आहे.
(४) गोड गोड बोलतो. डाळ, पेरू, खातो.
(५) आंब्याच्या झाडावर गोड गोड गाणे गातो.
(६) तळ्याकाठी उभे राहून ध्यान धरतो.
मासे खातो.
(७) याच्या आरवण्यावाचून सुर्य उगवायचा
राहत नाही.
(८) हिच्या केसांपासून लोकर मिळते.
(९) याला जंगलाचा राजा म्हणतात.
(१०) याच्या दातापासून कलाकुसरीच्या वस्तू
तयार करतात.
(११) धूर्तपणाबद्दल प्रसिद्ध असणारा प्राणी.
(१२) पाठीची ढाल करणारा प्राणी.
(१३) याची धाव कुंपणापर्यंत.
(१४) याला वाळवंटातील जहाज म्हणतात.
(१५) हा पावसाची आतुरतेने वाट पाहतो.
उत्तरे :- (१)मोर, (२)सुतारपक्षी, (३)सुगरण
(४) पोपट(५)कोकिळ (६)बगळा (७)कोंबडा
(८)मेंढी (९)सिंह (१०)हत्ती (११)कोल्हा
(१२)कासव (१३)सरडा (१४)उंट (१५)चातक
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
पत्नीच्या बहिणीच्या मुलीला काय म्हणतात?
ReplyDelete