🔹 स्वत:बद्दल असे बोला.📞
संकलक :-- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१)मी ..............चा रहिवासी आहे
(२)माझा जन्म .../..../...... रोजी झाला.
(३)मी शिक्षक आहे.
(४)मी जिल्हा परिषद शाळेत काम करतो.
(५)मला रोज आठ तास काम करावं लागतं.
(६)मला वाचनाचा छंद आहे.
(७)मला माझ्या देशाचा अभिमान आहे.
(८)मी विसरभोळा नाही.
(१०)मी निराशावादी नाही.
(११)मी खूप काम करतो आणि सर्वोत्तम
घडेल अशी आशा करतो.
(१२)म्हणून मी आशावादी आहे.
(१३)मी दैववादी नाही.
(१४)मराठी आणि समाजशास्त्र हे माझे
आवडते विषय आहेत.
(१५)मी विक्षिप्त इसम नाही.
(१६)मी स्वार्थीही नाही आणि निःस्वार्थीही
नाही.
(१७)मी एक सामान्य नागरिक आहे.
(१८)'आपले काम म्हणजेच पूजा 'हे माझे
ध्येयवाक्य आहे.
(१९)'कधीही निराश होऊ नका ' हे
ध्येयवाक्य आहे.
(२०)आमचे कुटूंब लहान आहे.
(२१)मी एक चांगला शिक्षक आहे.
(२२)मला ग्रामीण/शहरी भागातील जीवन
प्रिय आहे.
(२३)मी शिक्षणप्रेमी आहे.
(२४)ज्ञान हे संपत्तीपेक्षा फार श्रेष्ठ आहे.
असे माझे मत आहे.
(२५)मला समाजात मिसळणं आवडतं.
(२६)मला खेड्यात आणि शहरातही काम
करणं आवडतं.
(२७)मी शांतताप्रिय माणूस आहे.
(२८) मी कायदे पाळणारा आहे.
(२९) मी लोकशाहीवादी आहे.
(३०)नागरिक या नात्याने माझ्या जबाबदार्या
मी कधीही विसरत नाही.
(३१)मी कर्तव्य निर्धारपूर्वक पार पाडतो.
(३२)मी एक सुशिक्षित पुरूष/स्त्री आहे.
(३३)मी समाज कार्यकर्ता आहे.
(३४)निरक्षर लोकांमध्ये साक्षरतेचा प्रसार
करण्यासाठी मी कार्य करतो.
(३५)मला माझ्या कामातून खूप समाधान
मिळते.
(३६)मला आत्मस्तुती करणं आवडत नाही.
(३७)पण मी स्पष्टवक्तेपणाने बोलण्यास
कचरत नाही.
✍संकलक :-- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment