🔯हसत खेळत- साफसफाई उपक्रम🔯
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
🔹 उपक्रम :- १
🔼 आपले दप्तर साफ करूया 🔼
* तुमचे दप्तर उघडा.
*त्यातून पुस्तके,वह्या,पेन,पेन्सिल व इतर गोष्टी
बाहेर काढा. त्या नीटनेटक्या रचून ठेवा.
* तुमची बॅग उलटी करा व वरचे कोपरे पकडून
चांगल्या तऱ्हेने झटका.
* बॅग आतून बाहेरून साफ पुसा.
*,आता ती स्वच्छ झाली का ?
छान !
* बॅगेत पुस्तके व वह्या नीटनेटकी ठेवा.
* इतर वस्तूसुद्धा पुन्हा योग्यप्रकारे तुमच्या बॅगेत
ठेवा.
--------------------------------------------------------
🔹उपक्रम - २
🔼आपला वर्ग साफ करूया :- 🔼
* तुमची सतरंजी स्वच्छ आहे का ?
ती वर धरा व चांगल्या तऱ्हेने झटका.
* तुमचे बाक स्वच्छ आहे का ?
एक ओले फडके घ्या व बाक स्वच्छ करा.
ते फडके सुकण्यासाठी टांगून ठेवा.
* जमीन स्वच्छ आहे का ?
कागदाचे कपटे(तुकडे) व इतर कचरा उचला
आणि कचर्याच्या डब्यात टाका.
* (आता ) जमीन झाडूंनी झाडूया.
कचरा गोळा करण्याच्या सुपलीत कचरा गोळा
करा व कचर्याच्या डब्यात टाका.
--------------------------------------------------------
🔹 उपक्रम :- ३
🔼आपण स्वतः स्वच्छ होऊया :- 🔼
* नळावर जा. नळ उघडा.
* तुमचे हात, पाय आणि चेहरा भिजवा.
* पाणी वाया(फुकट) घालवू नका.
* नळ बंद करा.
* साबणाची वडी घ्या आणि तुमच्या हातावर
चोळा.
* आणि साबणाचा फेस तयार करा.
* तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ(चांगला) धुवा.
* तुमच्या हातांना आणि पायांना साबण लावा.
* पाण्याने ते चांगले धुवा.
* एक स्वच्छ टाॅवेल घ्या व तुमचा चेहरा आणि
हातपाय पुसा.
* तुम्ही (पूर्ण) कोरडे होईपर्यंत पुसा.
* टाॅवेल वाळण्याकरता बाहेर टांगा.
* तुमच्या वर्गात परत जा.
👫 स्वच्छ वर्गात स्वच्छ मुले आणि मुली !👫
संकलक :- शंकर चौरे (प्रा. शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment