माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

 या वस्तूंशी मैत्री करा !


       ☄ या वस्तूंशी मैत्री करा ! ☄

      संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
                      ☆ ९४२२७३६७७५ ☆

(१) हातरूमाल :-
      शिंकताना किंवा खोकताना नाका-तोंडावर
हातरूमाल धरावा लागतो. थुंकीवाटे इतरांना
रोगांची लागण होत नाही. यामुळे सार्वजनिक
आरोग्याची काळजी घेतली जाते.तोंड पुसायला,
हात पुसायला तसेच स्वच्छतेची सवय म्हणून
हातरूमालचा उपयोग होतो. त्यामुळे वैयक्तिक
स्वच्छता राखली जाते.

(२) साबण :-
        साबण जंतुनाशक व सुवासिक असतात.
आंघोळ करताना साबणामुळे शरीराची स्वच्छता
राखता येते. हात साबणाने स्वच्छ धुतल्यास
आपले रोगांपासून संरक्षण होते.शौचास जाऊन
आल्यावर साबणाचा उपयोग हात स्वच्छ
करायला होतो.
      कपड्याच्या साबणाने कपड्याची स्वच्छता
राखता येते.

(३) कंगवा :-
        कंगव्यामुळे केस व्यवस्थित विंचरता येतात.
केसातील उवा- लिखा व कोंडा काढून टाकण्या-
साठी कंगवा वापरतात. मोठ्या केसांतील गुंता
काढण्यासाठी कंगवा उपयुक्त असते.

(४) नेलकटर :-
         वाढलेली नखे वेळच्या वेळी सुरक्षितरीत्या
कापून टाकण्यासाठी नेलकटरचा उपयोग होतो.

            संकलक :- शंकर चौरे
                          पिंपळनेर  
                          ता.साक्री जि. धुळे
                           📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment