विषय- मराठी (भाषा)
🔼ध्वनिसाम्य असलेले शब्द व अर्थ 🔼
🔹संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर)धुळे
उच्चारात बरेच साम्य असलेले; पण भिन्न
अर्थ असणारे शब्द लिहिताना चुकल्यास
विपरीत अर्थ दर्शवतात. केवळ र्हस्व-दीर्घ,
काना-मात्रा -अनुस्वार यांच्या फरकांमुळे
अर्थ बदलता.
●उदाहरणार्थ --
(१) ग्रह -- (सूर्याभोवती फिरणारा गोल)
गृह -- ( घर )
(२) उपहार --( नजराणा , भेट )
उपाहार -- (फराळ )
(३) संचित -- ( साठवलेले )
सचिंत -- ( चिंताग्रस्त )
(४) पिक -- ( कोकीळ )
पीक --( धान्य )
(५) भाषक --( बोलणारा )
भाषिक --( भाषेसंबंधी )
(६) लक्ष -- (लाख )
लक्ष्य -- ( साध्य )
(७) दिन -- ( दिवस )
दीन -- ( गरीब )
(८) सुत -- ( मुलगा )
सूत -- ( धागा )
संकलक :-- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment