🔸खरेदी-विक्री /नफा -तोटा गणितीय माहिती🔹
लेखन :- शंकर चौरे (पिंपळनेर)धुळे
♢९४२२७३६७७५♢
(१) वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची खरेदी
करणे.
(२) वस्तू विकणे म्हणजे वस्तूची विक्री करणे.
(३) खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत जास्त
असल्यास नफा झाला असे म्हणतात.
(४) खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत कमी
असल्या तोटा झाला असे म्हणतात.
*************************************
◾ खरेदी किंमत --
एखादी वस्तू ठराविक किंमत/रक्कम देऊन
विकत घेतात, त्या किमतीला खरेदी किंमत
असे म्हणतात.
उदा. सुमितने १० रू. ला पेन विकत घेतला .
१० रुपये ही पेनाची खरेदी किंमत.
◾ विक्री किंमत --
एखादी वस्तू ज्या किमतीत /रक्कमेत
विकली जाते, त्या किमतीला विक्री
किंमत असे म्हणतात.
उदा. दुकानदाराने वही १५ रू. ला विकली.
१५ रूपये ही वहीची विक्री किंमत झाली.
◾नफा --
जेव्हा एखाद्या व्यवहारात खरेदी किंमत
विक्री किमतीपेक्षा कमी असते तेव्हा
नफा झाला असे म्हणतात.
उदा. एक पेन १० रू. ला घेतला व १५ रू.
ला विकला, तर ५ रुपये नफा झाला.
◾ तोटा --
एखाद्या व्यवहारात जेव्हा खरेदी किंमत
विक्री किमतीपेक्षा जास्त असते, तेव्हा
तोटा झाला असे म्हणतात.
उदा. १५ रु. ला घेतलेला पेन १० रूपयाला
विकला तर ५ रूपये तोटा झाला .
लेखन :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment