🔹शब्दांचा अर्थ🔹
✍संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१)माहेर :-
-- विवाहित मुलीच्या आई- वडिलांचे घर.
(२)आजोळ :-
-- आईच्या माहेरचं गाव/मामाचे घर.
(३)शिंके :-
-- वस्तू अधांतरी ठेवण्यासाठी केलेली
दोराची टोपली.
(४)मुस्की :-
-- गुरांच्या तोंडाला बांधलेली दोरीची जाळी.
(५)गुराखी :-
-- गुरे चरावयास नेणारा व त्यांची राखण
करणारा.
(६) जातं :-
-- धान्य दळण्याचे दगडाचे साधन.
(७) दरड :-
-- डोंगराचा कडा.
(८) प्रत्यक्षदर्शी :-
-- घटना प्रत्यक्ष पाहणारे.
(९) माहेरवाशीण :-
-- लग्न झालेली माहेरी आलेली स्री.
(१०) वैरण :-
-- गुरांना खाण्यासाठीचा चारा.
(११)प्रजाहितदक्ष :-
-- प्रजेचे कल्याण करण्यास तत्पर
असणारा.
(१२) शिल्पकला :-
-- दगडावरील कलात्मक कोरीव काम.
(१३)हस्तकला :-
-- हाताने कलाकुसरींच्या बनवलेल्या वस्तू.
(१४) नृत्यकला :-
-- शारीरिक हावभाव करून केलेला नाच.
(१५)वावटळ :-
-- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment