शैक्षणिक उखाणे
१ )मराठी भाषेला महत्त्व आहे फार
ज्ञानरचनावादाने लावला शिक्षणाला हातभार .
२)आपल्या राज्यात करावा मराठी भाषेचा मान
आ आई, त ताई, ऐका सर्व देऊन कान.
३)कोरा कागद, काळी शाई
रोज मला शाळेत जाण्याची घाई.
४) भाषण करतांना असावी शब्दाची साठवण
गुणाकार करतांना करावी पाढ्यांची आठवण.
५) मला आहे ज्ञानरचनावादी शिक्षणाची आवड
मी केली चौरे सरांची जि.प शाळेची निवड .
६)मँडम आमची छान शिक्षण देते
मी हसतखेळत शिक्षण घेते.
७)जि.प.शाळेत ज्ञानरचनावादी गजर
विद्यार्थी रोज असतात शाळेत हजर.
८)द्राक्षेच्या वेलीवर त्रिकोणी पान
रचनावादी शिक्षणाने राखला शाळेचा मान.
९)नयनरम्य बागेत नाचत होता मोर
ज्ञानरचनावादी शिक्षण आले, भाग्य माझे थोर.
१०)वन,टू,थ्री
ज्ञानरचनावादी शिक्षण एकदम फ्री.
११)हसायचं खेळायचं सर्व काही करायचं
हसतखेळत शिक्षण घ्यायला कशाला लाजायचं .
१२)शिक्षणाच्या सागरात भाषा -गणिताची जोडी
ज्ञानरचनावादी शिक्षण घेण्याची मला लागली
गोडी.
१३)ज्ञानदानाने करतो मी कर्तव्यपूर्ती
रचनावादी शिक्षणाने मिळाली मला स्फूर्ती.
लेखन -
शंकर चौरे.(प्रा.शि)
जि.प.शाळा बांडीकुहेर ता.साक्री(धुळे )
Mo. 9422736775
No comments:
Post a Comment