🔹 कशात काय ?🔹( बडबडगीत )
राजवाड्यात राणी
विहिरीत पाणी
कपाटात साडी
अंगणात गाडी
टोपलीत भाकर
बरणीत साखर
कढईत पाक
मडक्यात ताक
ताटलीत गूळ
जमिनीत मूळ
किटलीत चहा
उजळणीत दहा
वाटीत दही
दप्तरात वही
दिव्यात तेल
बागेत वेल
घरात मूसळ
ताटात उसळ
डब्यात पीठ
बशीत मीठ
थाळीत भात
समईत वात
जंगलात ससा
पाण्यात मासा
लेखक/कवी :- शंकर सिताराम चौरे
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment