माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 30 March 2017

प्रश्नपेढी -द्वितीय सत्र

             ■प्रश्नपेढी -द्वितीय सत्र ■
                 इयत्ता -पहिली
           विषय :- मराठी(तोंडी परीक्षा)

   संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤
प्रश्न :-
(१)तुम्हांला कोणते फूल आवडते ? का?
(२)तुम्हांला कोणते फळ आवडते ? का ?
(३)तुम्हांला कोणता प्राणी आवडतो ?का ?
(४)तुम्हांला कोणता पक्षी आवडतो ? का ?
(५)तुम्हांला कोणता सण आवडतो ? का ?
(६) दोन कीटकांची नावे सांगा.
(७) तुमच्या दोन मित्र/मैत्रिणींची नावे सांगा?
(८)तुमचे संपूर्ण नाव सांगा.
(९)पाण्यावर चालणारी दोन वाहने सांगा.
(१०)जमिनीवर चालणारी दोन वाहने सांगा.
--------------------------------------------
     ● विषय- मराठी / इयत्ता -दुसरी ●
                ■ तोंडी परीक्षा ■
(१)शेतातील कामे सांगा.
(२)भाकरी ज्या धान्यांपासून बनतात,
    त्या दोन धान्यांची नावे सांगा.
(३)शेतीच्या अवजारांची नावे सांगा.
(४)तुमच्या घरी कोणती धान्ये आणली
    जातात  ?
(५) तुमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन कसा
      साजरा केला जातो ?
(६)'हसत-खेळत ' सारखे दोन शब्द सांगा.
(७)शहर व खेडे यांतला फरक सांगा.
(८)राष्ट्रध्वजातील रंग सांगा.
(९)राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
(१०)आपले राष्ट्रगीत कोणते ?
(११)आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
(१२)आपला राष्ट्रीय पक्षी कोणता  ?
(१३)आपले राष्ट्रीय फूल कोणते ?
(१४)तुम्हाला कोणत्या गोष्टींची भीती
      वाटते  ? का ?
(१५)एखादे गाणे म्हणून दाखवा.
(१६)उंच झाडांची दोन नावे सांगा.
(१७) वेलींची दोन नावे सांगा.
----------------s s. chaure ------------
■विषय- मराठी  /इयत्ता -तिसरी ■
          ●तोंडी परीक्षा●
(१)चार पाळीव प्राण्यांची नावे सांगा.
(२) इंग्रजी महिन्यांची नावे सांगा.
(३) चार जंगली प्राण्यांची नावे सांगा.
(४)उजेड देणार्‍या वस्तूंची नावे सांगा.
(५) चार हुतात्म्यांची नावे सांगा.
(६)झाडांचे तीन उपयोग सांगा.
------------------------------------------------
■ विषय - मराठी /   इयत्ता-चौथी
           ● तोंडी परीक्षा ●
(१)कच्चे खाऊ शकणार्‍या दोन पदार्थांची
    नावे सांगा.
(२)माहीत असलेल्या दोन म्हणी सांगा.
(३)'नारळ ' झाडाचे वैशिष्ट्ये सांगा.
(४)'कडुलिंब ' झाडाचे वैशिष्ट्ये सांगा.
(५) सचिन तेंडुलकरांचे दोन विक्रम सांगा.
(६)तुम्हांला कोणत्या वाहनातून प्रवास
    करायला आवडते ? का ?
(७)तुमच्या शाळेचे नाव व पत्ता सांगा.
(८)तुम्हाला तोंडपाठ असलेली कविता म्हणा.

    संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                  📞 ९४२२७३६७७५

प्रश्नपेढी - द्वितीय सत्र

       🔹 प्रश्नपेढी - द्वितीय सत्र🔹
             ■  इयत्ता -पहिली ■
  विषय- गणित (तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा )

      संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                     ¤ ९४२२७३६७७५ ¤

प्रश्न :-
(१)कंगव्यापेक्षा लांब असणाऱ्या एका
    वस्तूचे नाव सांगा.
(२)शेवग्याची शेंग व केळे यांपैकी आखूड
     वस्तू कोणती ?
(३)बेरीज ६ येईल अशी संख्यांची एक
    जोडी सांगा.
(४)१५ मध्ये किती दशक व किती एकक
     आहेत ?
(५)१९ नंतर लगेच येणारी पुढची संख्या      कोणती?
(६)३४ पेक्षा लहान असणारी एक संख्या सांगा.
(७)४१ व ४३ यांच्यामधील संख्या सांगा.
(८) ५१ ते ६० या संख्या क्रमाने बोला.
(९)गुरुवार नंतर कोणता वार येतो  ?
(१०)१० वजा ९ बरोबर किती  ?
         ● प्रात्यक्षिक ●
(१)दोन वस्तूंपैकी लांब वस्तू दाखवा.
 - टूथब्रश व पेन्सिल./खडूचा तुकडा आणि
     अख्ख्या खडू.... निरनिराळ्या लांबी
     असणाऱ्या कोणत्याही २ वस्तू.     
------------------------------------------------
           ■इयत्ता - दुसरी ■
    विषय :- गणित (तोंडी/प्रात्यक्षिक)

(१)५२ , ४९आणि ५७ यांपैकी सर्वांत लहान
    संख्या कोणती ते सांगा.
(२)पुढील संख्या उतरत्या क्रमाने सांगा :
    १७ , ९,  २६.
(३)६ दशक ४ एकक म्हणजे किती एकक ?
(४) ३५ या संख्येत किती दशक आहेत ?
(५) ६५ व ६ यांची बेरीज किती ते सांगा.
(६) एका गुच्छात ५ फुले,अशा ३ गुच्छांत
     एकूण किती फुले असतील ?
(७) दोनचा संपूर्ण पाढा म्हणा.

           ● प्रात्यक्षिक ●
(१)दहा -दहाचे गट करून दिलेल्या वस्तू
    मोजा.
    उदा. बिया /खडे /मणी /बटणे.
(२)नाणी /नोटा निवडून सांगितलेली रक्कम
   वेगळी करून दाखवा.
      उदा. १५ रुपये / ३० रूपये
(३)दिलेल्या दोन दशकमाळांमधून १४मणी
   वेगळे करा.
       ¤ वस्तू - २ दशकमाळा.
------------------s.s.chaure---------------
        ■ इयत्ता -तिसरी ■
      विषय :- गणित(तोंडी /प्रात्यक्षिक)

प्रश्न :-
(१)३ शतक २ दशक म्हणजे किती दशक ?
(२)४१७ या संख्येत किती शतक आहेत  ?
(३) ४९९+१ ही बेरीज किती येईल  ?
(४)८०० मधून १ वजा केल्यास कोणती
     संख्या मिळेल  ?
(५)ज्या दोन संख्यांची बेरीज १०० आहे,
    अशी जोडी सांगा.
(६) एका पेटीत ३० पेन्सिली , अशा १०
     पेट्यांत एकूण किती पेन्सिली ?
(७) २ तास म्हणजे किती मिनिटे ?
(८)३० दिवस असणाऱ्या महिन्यांची नावे
     सांगा  ?
(९) सानिया अर्धा तास खेळली,म्हणजे ती
    किती मिनिटे खेळली  ?
(१०)पाव डझन केळी म्हणजे किती केळी ?
(११) ५०० ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम  ?
(१२) पाव किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
        
             ●  प्रात्यक्षिक ●
(१) शतक बटवे,दशकमाळ व सुटे मणी
      यांचा उपयोग करून दोन संख्यांची
      बेरीज दाखवा.
   (उदा. १४० +९९/ ३२१ +११५ )
--------------------------------------------------
           ■ इयत्ता - चौथी ■
        ●विषय -गणित(तोंडी /प्रात्यक्षिक●

(१)२२ गोट्यांच्या समूहाचा निम्मा भाग
      म्हणजे किती गोट्या  ?
(२)अर्धा किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
(३) १०० ÷१० = किती  ?
(४) एका पेनची किंमत १० रूपये,तर २०
     पेनांची किंमत किती  ?
(५) ३००× १० = किती  ?
(६)जर ३ कंपासपेट्यांची किंमत ९० रूपये   असेल,तर एका कंपासपेटीची किंमत किती ?

             ● प्रात्यक्षिक ●
(१)दिलेल्या वस्तूंची लांबी मोजपट्टीच्या
 साहाय्याने मोजा. ही लांबी मिमीमध्ये सांगा.
    उदा. पेन्सिल ,खडू

      संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                     ता.साक्री जि.धुळे
                     📞९४२२७३६७७५

शब्द व त्यांचे अर्थ

          🔹शब्द व त्यांचे अर्थ 🔹

   संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५  ¤

(१)अतिथी -- घरी पाहुणा म्हणून आलेला.

(२)आदिवासी -- अगदी पूर्वीपासून राहणारे
                       मूळ रहिवासी.

(३)आस्तिक -- देव आहे असे मानणारा.

(४)उत्क्रांती -- हळूहळू घडून येणारा बदल.

(५)अनमोल - ज्याची किंमत होऊ शकत
                   नाही असे.

(६)अनाथ -- कोणचाही आधार नाही असा.

(७)टंकसाळ -- नाणी तयार करण्याचा
                     कारखाना.

(८) कृतघ्न -- केलेले उपकार न जाणणारा.

(९)जलचर --  पाण्यात राहणारे.

(१०)ताम्रपट -- तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले
                    लेख.

(११)दंतकथा -- तोंडातोंडी चालत आलेली
                      गोष्ट.

(१२) कृतज्ञ -- केलेले उपकार जाणणारा.

(१३)निरक्षर -- लिहिता, वाचता न येणारा.

(१४)तिठा - तीन रस्ते एकवटतात ती जागा.

(१५)पूरग्रस्त - पुरामुळे नुकसान झालेले लोक.

(१६)बहुरूपी -- विविध सोंग घेणारा.

(१७)भूचर -- जमिनीवर राहणारा.

(१८)माथाडी -- डोक्यावरून ओझे वाहून
                     नेणारा.

(१९)वासा -- घराच्या छताला आधार देणारे
                  लाकूड.

(२०)सनातनी -- जुन्या रूढी परंपरेनुसार
                      वागणारा.

(२१)साक्षर - लिहिणे, वाचणे येत असलेला.

       संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                     जि.प प्रा.शाळा -बांडीकुहेर
                     ता.साक्री जि.धुळे
                     📞 ९४२२७३६७७५

MY FAVOURITE

       🔼  MY  FAVOURITE 🔼

✍ Shankar Chaure(Pimplner)Dhule
             ¤ 9422736775 ¤

(1) My favourite colours .
---- Red , blue.

(2) My favourite games .
--- Kho -Kho  ,  cricket.

(3)My favourite fruits.
---- Mango ,  banana.

(4)My favourite vegetables.
---- Brinjal,  cabbage. .

(5)My favourite domestic animals.
---- Cow,   dog.

(6)My favourite wild animals.
---- Tiger,  deer.

(7)My favourite birds.
----  Peacock ,  crow.

(8)My favourite flowers.
---- Rose,  marigold.

(9)My favourite trees.
---- Coconut ,  Mango tree.

(10)My favourite grains.
----  Rice ,  ragi.

(11)My favourite dry  fruits.
---- Cashew nut,  date.

(12)My favourite  foods.
---- Rice,  milk.

(13)My favourite vehicles.
---- Bus ,  bicycle.

(14)My favourite  subjects.
---- Marathi,   art . 

(15)My favourite art.
----  Drawing  , craft.

(16)My favourite jewels.
---- Ring  , chain.

(17)My favourite aquatic animals.
---- Fish ,  Crab.

(18)My favourite reptile animals.
---- Snail , Tortoise

(19)My favourite seasons.
---- Rainy(monsoon), winter. 

(20)My favourite cities. 
---- Nasik,  kolhapur.

(21)My favourite forts.
---- Raigad,  Pratapgad.

         ✍ Shankar Chaure
          Z.P.School Bandikuher
         Tal.sakri  Dist. Dhule
         9422736775.             

PROVERBS(प्रोव्हर्बस) म्हणी

    🔹PROVERBS(प्रोव्हर्बस) म्हणी🔹

     संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                    ¤9422736775

(1) Tit for tat.
     जशास तसे.

(2) To err is human.
--  चुकणे हा मनुष्यधर्म आहे.

(3) Better late than never.
--  कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेले बरे.

(4) Health is wealth .
--  आरोग्य हेच धन.

(5) Honesty is the best policy.
--   प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.

(6) Might is right.
--   बळी तो कान पिळी.

(7) No pains, no gains
--   कष्टविना फळ नाही.

(8) No rose without throns.
--  काट्याशिवाय गुलाब नाही.

(9) Pride has a fall.
--   गर्वाचे घर खाली.

(10) All that glitters is not gold.
--     जे चकाकते ते सर्वच सोने नसते.

(11) All is well that ends well.
--    ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.

    संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                   📞9422736775

भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती

  🔹भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती🔹

    संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                   ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१) तापी नदी :--    
-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तिचा उगम
सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. ती
महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि
अरबी समुद्रास मिळते. पूर्णा ही तापी नदीची
प्रमुख उपनदी आहे.
-------------------------------------------------
(२) गोदावरी नदी :--
-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब
अशी नदी आहे. गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये
त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. ही नदी महाराष्ट्र
आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व
बंगालच्या उपसागरास मिळते. प्रवरा,मांजरा,
प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या
आहेत.
---------------------------------------------------
(३)कृष्णा नदी :--
-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे
उगम पावते. ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि
आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या
समुद्राला मिळते. भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या
कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत.
-------------------------------------------------
(४) गंगा नदी :--
-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची
नदी आहे. या नदीचा उगम गंगोत्री या
हिमनदीतून होतो. ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेश
व बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या 
उपसागरास मिळते.
---------------------------------------------------
(५) सिंधू नदी :--
-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू
नदीच्या काठीच झाला. ही नदी हिमालयात
मान सरोवराजवळ उगम पावते. ती जम्मू
आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात
प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

       संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                      जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                      ता.साक्री जि.धुळे
                      📞 ९४२२७३६७७५

म्हणजे काय ?

              🔹 म्हणजे काय ?🔹

   संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)भूचर :--
-- जे प्राणी जमिनीवर राहतात, त्यांना
   भूचर म्हणतात.  उदा. मांजर, कोल्हा.

(२)जलचर :--
-- जे प्राणी पाण्यात राहतात, त्यांना
   जलचर असे म्हणतात. उदा. मासा.

(३)उभयचर :--
-- जे प्राणी जमीन व पाणी या दोन्ही
   ठिकाणी राहू शकतात,त्यांना 'उभयचर '
   म्हणतात.  उदा. बेडूक.

(४)वृक्ष :--
-- खूप उंच वाढणार्‍या टणक व मजबूत
   खोड असलेल्या वनस्पतींना वृक्ष
   म्हणतात.  उदा.  आंबा,  वड,  माड.

(५)झुडूप :--
-- टणक व मजबूत खोडाच्या; पण मध्यम
   उंची असलेल्या वनस्पतींना झुडूप
   म्हणतात.  उदा. संत्रे,  लिंबू, कण्हेर.

(६)वेल :--
-- कमकुवत खोड असणाऱ्या आणि
  आधाराने वाढणार्‍या वनस्पतींना
  वेली म्हणतात.  उदा. काकडी. भोपळा.

(७)रोपटी :--
-- मऊ आणि लवचिक खोड असलेल्या
  वनस्पतींना रोपटी म्हणतात. उदा. तुळस.

(८)वन :--
--एखाद्या प्रदेशात वृक्ष, झाडे- झुडपे, वेली,
  गवत इत्यादी निरनिराळ्या प्रकारच्या
  अनेक वनस्पती नैसर्गिकरीत्या वाढतात.
  अशा परस्परावलंबी समूहास 'वन' म्हणतात.

(९)वन्यप्राणी :--
-- जे प्राणी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात.
   आणि नैसर्गिक जीवन जगतात, त्यांना
   वन्यप्राणी म्हणतात. उदा. वाघ,कोल्हा .

(१०)शाकाहारी प्राणी :--
--- वनस्पतीजन्य पदार्थ खाऊन जे प्राणी
    आपली अन्नाची गरज भागवतात.
    त्यांना  ' शाकाहारी प्राणी ' म्हणतात.
    उदा. गाय, हरिण, बैल, गाढव. 

(११)मांसाहारी प्राणी :--
--- जे प्राणी इतर प्राण्यांचे मांस खाऊन
    आपली उपजीविका करतात, त्यांना
    'मांसाहारी ' प्राणी म्हणतात.
    उदा. सिंह , साप, घार, वाघ.

(१२)उभयाहरी प्राणी :--
--- जे प्राणी वनस्पतिजन्य पदार्थ त्याचप्रमाणे
     मांस खाऊन आपली अन्नाची गरज
     भागवतात, त्यांना ' उभयाहारी प्राणी '
    म्हणतात.  उदा. मानव, कुत्रा, मांजर.

    ✍संकलक:-- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                      जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                      ता.साक्री जि.धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

ओळखा पाहू मी कोण ?

          विषय :- विज्ञान(प.अभ्यास)

        🔹ओळखा पाहू मी कोण ?🔹

    संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                   ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)दिसत नाही कधी कुणाला
     पण जाणवतो क्षणाक्षणाला
     छातीच्या पिंजर्‍यात लपून असतो
     भीती वाटली तर धडधडतो
     ओळखा पाहू मी कोण  ?

(२)चिरून धुतले भाजीला
     तर - आम्ही विरघळतो पाण्यात
     होते कमी पोषकता
     भाजीची काही क्षणात

(३)घर सावरण्यासाठी उपयोग होतो
    माझ्यापासून बायोगॅस तयार होतो
    कुजल्यावर मी खत होतो
    सांगा पाहू मी कोण  ?

(४)माझ्यापासून बनवितात स्वेटर
     घोंगडी बनवून वापरतो धनगर
     थंडी, वा-यापासून बचाव करण्यासाठी
     माझा वापर
     सांगा पाहू मी कोण ?

  उत्तरे :-(१)ह्दय,(२)क्षार व जीवनसत्त्वे
            (३) शेण    (४) लोकर

      संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                    जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                    ता.साक्री जि.धुळे
                    📞 ९४२२७३६७७५

कालमापन

           🌎कालमापन 🌎

   ✍संकलक :-- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
                     📱९४२२७३६७७५

     पृथ्वी स्वतःभोवती भोव-यासारखी फिरत
असते. तिला स्वतःभोवती एक फेरी मारायला
२४ तास लागतात. २४ तास म्हणजेच एक
पूर्ण दिवस. तिच्या स्वतःभोवती फिरण्यामुळेच
दिवस व रात्र होतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता
फिरता सूर्याभोवतीही फिरते.सूर्याभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर येतो,तो भाग प्रकाशात असतो.अशा प्रकाश असण्याच्या   काळालादेखील आपण 'दिवस' असेच म्हणतो. जो भाग सूर्याच्या समोर नसतो तेथे अंधार असतो.त्या अंधाराच्या काळाला आपण 'रात्र ' असे म्हणतो.
    पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला सुमारे
३६५ दिवस लागतात. या कालावधीला १ वर्ष
म्हणतात. या एका वर्षाचे साधारणपणे १२ समान
भाग केलेले आहेत. प्रत्येक भागाला 'महिना 'असे
म्हणतात. प्रत्येक महिन्याला स्वतंत्र नाव आहे.
प्रत्येक महिन्यात साधारणपणे चार सप्ताह
असतात. सप्ताहात सात दिवस असतात.
सप्ताहातील दिवसाला वार म्हणतात. प्रत्येक
वाराला स्वतंत्र नाव दिलेले आहे. एकदा आलेला
वार पुन्हा ७ दिवसांनंतर येतो.
   कोणत्या महिन्यात किती दिवस व कोणत्या
दिवशी कोणती तारीख येते, ही माहिती
दिनदर्शिकेवरून कळते.

  ✍ संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                       जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                       ता.साक्री जि.धुळे
                       📞 ९४२२७३६७७५

उपसर्गघटित शब्द

           विषय :- मराठी(भाषा)

        🔹 उपसर्गघटित शब्द 🔹

  ✍संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                    ¤ ९४२२७३६७७५ ¤

● शब्दांच्या आधी जोडलेल्या अक्षराला किंवा
   अक्षरांना ' उपसर्ग ' म्हणतात.
      उदा. अ + बोल = अबोल.
   'बोल ' या शब्दाच्या आधी 'अ' हे एक अक्षर
जोडले आहे; म्हणून अबोल हा नवीन शब्द
तयार झाला. ( ' अ 'म्हणजे नाही. ' अबोल '
म्हणजे न बोलणारा. )

● शब्दांच्या आधी उपसर्ग लावून तयार
  झालेल्या नवीन शब्दांना उपसर्गघटित
  म्हणतात.

■'अ ' उपसर्ग असलेले शब्द :--
  अखंड              अमान्य   
  अचल              अमूल्य
  अनाथ              अयोग्य
  अपचन             अविचार
  अपक्ष               अविवाहित
  अप्रगत              अविश्वास
  अप्रिय               अशक्य
  अपूर्ण                अशांत
  अभय                अशुद्ध         
  अमर                 अशुभ
  अमंगल              असत्य
  अहिंसा               अज्ञान

■ ' आ ' उपसर्ग असलेले शब्द :--
  आकार               आभास
  आकृती               आमरण      
  आचार                आवार
  आजन्म               आश्रम
  आजीव               आगामी
  आनंद                 आरक्षण

■ ' प्र ' उपसर्ग असलेले शब्द :--
  प्रकार                  प्रदेश
  प्रखर                   प्रपंच
  प्रगत                    प्रभाग
  प्रगती                   प्रभाव
  प्रघात                   प्रमुख
  प्रचंड                   प्रयोग
  प्रचार                   प्रवास
  प्रताप                   प्रवाह
  प्रदर्शन                 प्रवेश
  प्रदान                   प्रशांत
  प्रदीप                   प्रसंग

■ ' वि ' उपसर्ग असलेले शब्द :--
  विक्रम                 विपक्ष
  विकार                 विभाग
  विकास                वियोग
  विकृती                 विराग
  विजय                  विराट
  विदेश                   विरोध
  विधवा                  विलास
  विनम्र                   विवाद
  विनोद                   विज्ञान   

■ ' सु ' उपसर्ग असलेले शब्द :--
  सुकन्या                सुमन
  सुकर                   सुबोध
  सुकर्म                  सुरेख
  सुकाळ                 सुवर्ण
  सुगंध                   सुवार्ता
  सुजन                   सुवास
  सुजाण                  सुविचार
  सुधीर                   सुशीला

■ ' नि ' उपसर्ग असलेले शब्द :--
  निकट                 निखळ
  निकस                निचरा
  निकामी               निढळ
  निकाल                 नितळ
  निकोप                निनावी
  निराशा                निरोगी

 ✍संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                   ता.साक्री जि.धुळे
                     📞 ९४२२७३६७७५
 
 

ऐका व सांगा.

                    🔹  उपक्रम 🔹
                       ऐका व सांगा.

  ✍संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                        ¤ ९४२२७३६७७५ ¤

●उद्देश :- तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा
              सांगता येणे.

●सूचना :- सांगितलेली माहिती काळजीपूर्वक
               ऐका व परत सांगा.

●उपक्रमासाठी वापरावयाच्या माहितीचे
  काही नमुने --

(१)सूर्य सकाळी उगवतो.
     सूर्य संध्याकाळी मावळतो.

(२)बदक पाण्यात पोहते.
     घार आकाशात उंच उडते.

(३)उन्हाळ्यात कडक ऊन असते.
    हिवाळ्यात थंडी वाजते.

(४)ऊस गोड असतो.
    मिरची तिखट असते.

(५)चिंचेचे पान छोटे असते.
    वडाचे पान मोठे असते.

(६)कापसापासून कापड बनते.
    ऊसापासून साखर बनते.

(७)आपली नखे नियमित कापावीत.
     केस स्वच्छ असावेत.

(८)मेथी,पालक या पालेभाज्या आहेत.
     पालेभाज्या नेहमी खाव्यात.

(९)वाहने रस्त्यावरून धावतात.
    लोक बाजूने चालतात.

(१०)आम्ही बसने शाळेत जातो.
      आम्ही बसने घरी येतो.

(११)आमच्या गावात तलाव आहे.
       तलावात मासे आहेत.

(१२)ही आमची शाळा आहे.
      आम्हाला शाळा खूप आवडते.

(१३)आम्ही दररोज शाळेत येतो.
       आमच्या बाई गोष्टी सांगतात.

(१४)रात्री आकाशात चंद्र दिसतो.
       मुले चांदण्यात खेळतात.

(१५)रात्र संपते, सकाळ होते.
       पाखरांची किलबिल सुरू होते.

(१६)आम्ही सकाळी लवकर उठतो.
       दात स्वच्छ घासून तोंड धुतो.

(१७)अंगणात नळ चालू होता.
       सुप्रियाने नळ बंद केला.

(१८)गावात घरे असतात.
      शहरात उंच इमारती असतात.

(१९)शाळेसमोर आंब्याचे झाड आहे.
       त्याला आंबे लागतात.
      आंबे गोड असतात.

(२०)बाई फळ्यावर लिहितात.
       मी पाटीवर लिहिते.
       दादा वहीवर लिहितो.

      संकलक :-- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                      जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
                      ता.साक्री जिल्हा धुळे
                      📞 ९४२२७३६७७५