माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 23 March 2017

मी शेतकरी बोलतोय !


         ‍मी शेतकरी बोलतोय !

     मी शेतकरी आहे.मी माझ्या शेतात गहू,
ज्वारी आणि भाज्या पिकवतो. मी वाटाणे,
हरभरे आणि करडईसुद्धा पिकवतो.माझे
कुटुंब माझ्या कामात मला मदत करते.
आम्हां सर्वांना खूप मेहनतीने काम करावे
लागते. शेत नांगरणे, बियाणे पेरणे,पिकाला
पाणी देणे,तण बेणणे,पक्षी आणि कीटकांना
दूर ठेवणे- शेतकऱ्याचे काम खडतर असते.
  पीक तयार होते तेव्हा त्याची कापणी करावी
लागते, झोडपणी करावी लागते, साफसफाई
करावी लागते आणि मग धान्य बाजारात
न्यायला तयार होते. मला सकाळपासून
संध्याकाळपर्यंत काम करावे लागते.
  तरीही मला माझ्या कामात आनंद वाटतो.
कारण मी निसर्गाच्या सान्निध्यात(निकट)
काम करतो आणि लोकांसाठी अन्न
पिकवतो.

संकलक:- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                   पिंपळनेर
                    ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment