सामान्यज्ञान
● इतिहासातील कालगणना :-
--- भूतकाळात घडलेल्या घटनांचा परस्पर-
संबंध असतो. या घटनांचा कालक्रम
ठरवण्यासाठी काळ मोजण्याच्या पद्धतीला
'कालगणना ' असे म्हणतात.
●' इसवी सन ' हा शब्द कसा तयार झाला ?
--- येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी
सनाची कालगणना सुरू झाली. येशू ख्रिस्तांना
अरबी भाषेत ' ईसा ' असे म्हणतात. ईसावरून
' इसवी ' असा शब्द तयार झाला. ' सन 'म्हणजे
'वर्ष ' किंवा 'साल '. या तऱ्हेने इसवी सन हा
शब्द तयार झाला.
● इसवी सन व झसवी सन पूर्व म्हणजे काय ?
--- (१) येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून इसवी
सनाची कालगणना करतात.(२)येशू ख्रिस्तांच्या
जन्मानंतर घडलेल्या घटनांची कालगणना
म्हणजे ' इसवी सन ' होय, तर (२) येशू
ख्रिस्तांच्या जन्माआधी घडलेल्या घटनांची
कालगणना म्हणजे ' इसवी सन पूर्व ' होय.
● इसवी सन ही कालगणना का आज जगभर
का वारतात ?
--- आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांना
कालगणना करण्यासाठी सोईचे व्हावे, म्हणून
इसवी सन कालगणना आज जगभर वापरली
जाते.
● सन व शतक यात फरक कोणता ?
--- सनाच्या उल्लेखाने नेमक्या वर्षाचा बोध
होतो, तर शतकाच्या उल्लेखाने ढोबळमानाने
त्या शतकाच्या (१०० वर्षांच्या) कालखंडाचा
बोध होतो.
संकलक :- शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक )
पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment