विषय :- परिसर अभ्यास(भूगोल)
🔹भूरूपे/भूरूपांची थोडक्यात माहिती🔹
(१) मैदान म्हणजे काय ?
--- नैसर्गिक सपाट जमिनीस मैदान म्हणतात.
(२) टेकडी म्हणजे काय ?
--- जमिनीवरील उंचवट्याचा भाग म्हणजे
टेकडी होय.
(३) पठार म्हणजे काय ?
--- उंचीवरील सपाट प्रदेश म्हणजे पठार होय.
(४) डोंगर म्हणजे काय ?
--- उंच टेकडीला डोंगर म्हणतात.
(५) दरी म्हणजे काय ?
--- डोंगरावरील खूप खोल व लांबट भागास
दरी म्हणतात.
(६) खिंड म्हणजे काय ?
--- दोन डोंगरांतील अथवा पर्वतांतील खोलगट
अरुंद भागास खिंड म्हणतात.
(७) घाट म्हणजे काय ?
--- डोंगराळ अथवा पर्वताच्या भागात
वळणावळणाचा जो रस्ता असतो,
त्यास घाट म्हणतात.
(८) पर्वत म्हणजे काय ?
--- उंच डोंगराला पर्वत म्हणतात.
(९) शिखर म्हणजे काय ?
--- पर्वताचे निमुळते टोक म्हणजे शिखर
होय.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता. साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment