माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 29 March 2017

आपला राष्ट्रध्वज


        
                     आपला राष्ट्रध्वज

🎯ध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी.

(१)ध्वजाचा चुकीचा वापर कोठेही करू नये.
(२)ध्वज चुरगळलेला,फाटलेला,मलीन असता
      कामा नये.
(३) कोणत्याही व्यक्तीच्या मानवंदनेसाठी ध्वज
      खाली उतरवू नये.
(४)ध्वज ज्या काठीवर लावला असेल त्याच्या
     वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत.
(५)तोरण,गुच्छ,पताका म्हणून ध्वजाचा वापर
     करू नये.
(६)इतर रंगीत तुकडे ध्वजासारखे दिसतील असे
     जोडू नयेत.
(७)व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी ध्वज
     वापरू नये.
(८) ध्वजावरील केसरी रंगाचा पट्टा नेहमीच
      वरच्या भागात असावा.
(९)ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा
     तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.
(१०)ध्वज फाटेल या रीतीने तो फडकवू नये.
       वा बांधू नये.
(११)ध्वज फाटला वा मळला तर तो कोठेही
        फेकून देऊ नये अथवा त्याचा अपमान
        होईल अशा रीतीने त्याला नष्ट करू नये.
(१२)ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू
       नयेत.
(१३)काही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूशिवाय
       इतर कोणत्याही प्रसंगी ध्वज अर्ध्यावर
       उतरवू नये.
(१४)हवामान कसेही असले तरीही  
  सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात      येईल.
                आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा
      मानदंड आहे. आपल्या संस्कृतीचे, उज्ज्वल
      यशाचे,परंपरांचे ते प्रतीक आहे. त्याचा
      यथोचित आदर राखणे हे भारतीय नागरिक
      म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे.
                  
           संकलक :-शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
                        पिंपळनेर
                        ता.साक्री जि.धुळे
                       📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment