उपक्रम - भाषिक कोडी
🔹ओळखा,ओळखा- मी कोण ?🔹
🔼संकलक :~ शंकर चौरे .(पिंपळनेर)🔼
१. कोणता हा वृक्ष?
हा तर कोकणातला कल्पवृक्ष !
२. कोणता हा प्राणी,
वाहत राही ओझी गोणी गोणी !
३. कोणता हा प्राणी,
वाळवंटात प्रसंगी,उपयोगी पडतं
ह्याच्या पोटातील पाणी !
४. कोणता हा प्राणी,
पोटातच्या पिशवीत ठेवी बाळ,
असा हा गुणी !
५. कोणतं हे पान,
जसा हत्तीचा कान !
६. कोणतं हे पान,
शिवपूजेला ज्याला मान!
७. कोणते हे फळ,
पोटात ह्याच्या पाणी मधुर निर्मळ !
८. कोणतं हे फूल,
राजाच की,अंगावर सुंदर पाकळ्यांची झूल?
९. कोणता हा रंग,
हे तर नभाचं अंग !
उत्तरे :~१. नारळ, २.गाढव, ३.उंट,
४. कांगारू,५.केळ, ६.बेल,
७. नारळ,८.गुलाब,९ निळा .
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment