🔹 काही संख्यांच्या वाचनाची रीत🔹
● व्यवहारात काही संख्यांचे वाचन
वेगवेगळ्या पद्धतीने करतात.
उदा. २५० ही संख्या दोनशे पन्नास
न वाचता ती अडीचशे अशी वाचतात.
(१) १२५ = सव्वाशे
(२) २२५ = सव्वा दोनशे
(३) ३२५ = सव्वा तीनशे
(४) ९२५ = सव्वा नऊशे
(५) १२५० = सव्वा हजार
(६) १५० = दीडशे
(७) २५० = अडीचशे
(८) ३५० = साडे तीनशे
(९) १५०० = दीड हजार
(१०) १७५ = पावणे दोनशे
(११) २७५ = पावणे तीनशे
(१२) ३७५ = पावणे चारशे
(१३) १३७५० = पावणे चौदा हजार
(१४) १०० = १ शेकडा(एकशे)
(१५) २५ = पाव शेकडा
(१६) ५० = अर्धा शेकडा
(१७) ७५ = पाऊण शेकडा
(१८) १००० = १ हजार
(१९) २५० = पाव हजार
(२०) ५०० = अर्धा हजार
(२१) ७५० = पाऊण हजार
(२२) १००००० = १ लक्ष
(२३) २५००० = पाव लक्ष
(२४) ५०००० = अर्धा लक्ष
(२५) ७५००० = पाऊण लक्ष
✍ संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment