माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 29 March 2017

जोडशब्द व त्यांची फोड

.
      🔵जोडशब्द व त्यांची फोड 🔴

(१) घरोघरी -- प्रत्येक घरी
(२) पानोपानी --प्रत्येक पानात
(३) दारोदार --प्रत्येक दारी
(४) जागोजागी --प्रत्येक जागी
(५) गल्लोगल्ली -- प्रत्येक गल्लीत
(६)दरसाल --प्रत्येक वर्षी
(७)दररोज --प्रत्येक दिवशी
(८)गायरान --गाईंसाठी रान
(९)राजपुत्र --राजाचा पुत्र
(१०)राजवाडा -राजाचा वाडा
(११) वनभोजन --वनातील भोजन
(१२) ऋणमुक्त --ऋणातून मुक्त
(१३)सेवानिवृत्त --सेवेतून निवृत्त
(१४)नापसंत --पसंत नसलेला
(१५) नाइलाज --इलाज नसलेला
(१६)अशक्य --शक्य नसलेला
(१७)बेसावध --सावध नसलेला
(१८)पाणकोंबडा --पाण्यातील कोंबडा
(१९) हिरवागार --खूप हिरवा
(२०) पुरणपोळी --पुरण घालून केलेली पोळी
(२१)साखरभात --साखर घालून केलेला भात
(२२)लालभडक --खूप लाल
(२३)बहिणभाऊ --बहीण व भाऊ
(२४)पंधरासोळा --पंधरा किंवा सोळा
(२५)खरेखोटे --खरे किंवा खोटे
(२६)दिनक्रम --दिवसाचा क्रम
(२७)आम्रवृक्ष --आंब्याचा वृक्ष
(२८)घरजावई --घरचा जावई
(२९)सप्तसूर --सात सूर
(३०)पाऊलवाट --पावलांनी तयार झालेली वाट
(३१) क्रांतिकारक --क्रांती करणारा
          
    संकलक :--शंकर चौरे                     
                    पिंपळनेर
                    ता. साक्री जि.धुळे
                   📞९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment