🔹भाषिक खेळ🔹
🔼साखळीतील कड्या जोडा 🔼
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
■ उद्देश :- शब्दांतील परस्परसंबंध जाणून
त्यांना क्रमाने लावणे.
■सूचना:-हा खेळ दोन गटांत किंवा दोन
दोन्ही मुलांत खेळता येईल. खाली
काही शब्दसाखळया दिल्या आहेत.
यात एका शब्दाशी दुसर्या शब्दाचा
घनिष्ठ संबंध आहे. हा खेळ खेळताना
पहिल्या मुलाने साखळीतील गाळलेली
जागा योग्य शब्दाने ३० सेकंदात भरावी.
जर तो भरू शकला नाही. तर दुसरा
मुलगा भरेल. याप्रमाणे जास्त गुण
मिळविणारा जिंकेल.
प्रश्न शब्द / उदा.
(१)झाड - कळी - ------ - फळ.
(२)फूल - मधमाशी - ------ - मध .
(३)बीज - ------ - रोप - झाड.
(४)कापूस - ------- - कापड - वस्त्र.
(५)बांबू - लगदा - ------- - कागद.
(६)दूध - -------- - लोणी - तूप.
(७)झाड - चिक - -------- - चेंडू.
(८)सुरवंट - कोश - ------- - कापड.
(९)समुद्र - -------- - ढग - पाऊस
(१०)भुईमूग - -------- - घाणा - तेल.
(११)सागर - शिंपले - ------ - माळ.
-----------------------------------------------
उत्तरे :---
(१) झाड - कळी - फूल - फळ.
""""""
(२) फूल - मधमाशी - पोळे - मध.
""""""
(३) बीज - अंकुर - रोप - झाड.
"""""""
(४) कापूस - सूत - कापड - वस्त्र.
"""""
(५) बांबू - लगदा - कारखाना - कागद.
""""""""""""
(६) दूध - दही - लोणी - तूप.
""""""
(७) झाड - चिक - रबर - चेंडू.
""""""
(८) सुरवंट - कोश - रेशीम - कापड.
"""""""
(९) समुद्र - वाफ - ढग - पाऊस
""""""
(१०) भुईमूग - शेंगदाणे - घाणा - तेल.
"""""""""
(११) सागर - शिंपले - मोती - माळ.
"""""""
© संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment