🔹 शाब्दिक उदाहरणे - गुणाकार 🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१)एका पेनची किंमत ५ रूपये, तर अशा
३ पेनांची किंमत किती ?
---- ५ × ३ = १५ रूपये.
(२)एका बाकावर २ मुले बसतात. तर
९ बाकांवर किती मुले बसतील ?
---- २ × ९ = १८ मुले.
(३) एका वहीची किंमत १० रूपये, तर
१० वह्यांची किंमत किती ?
---- १० × १० = १०० रूपये.
(४)एका वाफ्यात फुलांची ६ रोपे,याप्रमाणे
८ वाफ्यांत किती रोपे लावता येतील ?
---- ६ × ८ = ४८ रोपे.
(५) प्रत्येक शर्टाला ५ बटणे लावायची
आहेत. ५ शर्टांसाठी किती बटणे लागतील ?
---- ५ × ५ = २५ बटणे.
(६) ४ फुलांचा एक गुच्छ याप्रमाणे ३ गुच्छ
बनविण्यासाठी किती फुले लागतील ?
---- ४ × ३ = १२ फुले.
(७) एका डब्यात २० लाडू आहेत,तर
अशा ३ डब्यांमधील लाडू किती ?
---- २० × ३ = ६० लाडू.
(८) एका बसमध्ये ३२ प्रवासी आहेत, तर
अशा २ बसमध्ये एकूण प्रवासी किती ?
---- ३२ × २ = ६४ प्रवासी.
(९) एका पेटीत २५ आंबे आहेत, तर अशा
४ पेट्यांमधील आंबे किती ?
---- २५ × ४ = १०० आंबे.
(१०) एका ओळीत ११ झाडे लावली, तर
अशा ९ ओळींतील झाडे किती ?
---- ११ × ९ = ९९ झाडे.
(११) ३० रूपयांस एक पुस्तक याप्रमाणे
७ पुस्तकांची किंमत किती ?
---- ३० × ७ = २१० रूपये.
(१२) एका ओळीत १२ मुले बसली तर
अशा ३ ओळींत किती मुले बसतील ?
---- १२ × ३ = ३६ मुले.
(१३) एका सप्ताहात ७ दिवस, तर
४ सप्ताहांत किती दिवस ?
----- ७ × ४ = २८ दिवस.
(१४)कवायतीसाठी मुलांच्या १० रांगा केल्या.
एका रांगेत १२ मुले होते. तर कवायतीसाठी
एकूण मुले किती ?
----- १० × १२ = १२० मुले.
(१५)प्रत्येक विद्यार्थ्याला २ सफरचंद याप्रमाणे
शाळेतील २०० विद्यार्थ्यांसाठी किती
सफरचंद लागतील ?
---- २०० × २ = ४०० सफरचंद
© संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
Sir please send me class 2 maths book
ReplyDelete