● उपक्रम ●
🔹 ऐका व सांगा 🔹
✍ संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
●उद्देश :- तोंडी सांगितलेली माहिती पुन्हा
सांगता येणे.
●सूचना :-सांगितलेली माहिती काळजीपूर्वक
ऐका व परत सांगा.
■ संच -१.
ऊस गोड असतो.
मिरची तिखट असते.
चिंच आंबट असते.
कारले कडू असते.
आवळा तुरट असतो.
■ संच - २.
ज्वारीची भाकरी करतात.
गव्हाची चपाती करतात.
तांदळाचा भात करतात.
डाळीची आमटी करतात.
साबुदाण्याची खिचडी करतात.
■ संच - ३.
वारा वाहतो.
आकाशात ढग येतात.
मुसळधार पाऊस पडतो.
सगळीकडे पाणीच पाणी होते.
सर्वांना आनंद होतो.
■ संच - ४
मला दोन हात आहेत.
मी हाताने जेवतो.
मी हाताने लिहितो.
मी हाताने नमस्कार करतो.
मी हाताने काम करतो.
■ संच - ५
शाळेसमोर बाग आहे.
बागेमध्ये फुले आहेत.
फुलांवर फुलपाखरे उडतात.
मधमाशी मध गोळा करते.
पोळ्यामध्ये साठवून ठेवते.
■ संच - ६
सूर्य सकाळी उगवतो.
सूर्याचा प्रकाश पडतो.
दुपारी ऊन कडक असते.
सूर्य संध्याकाळी मावळतो.
रात्री अंधार पडतो.
■ संच - ७
गावात घरे आहेत.
गावाबाहेर शेती आहे.
शेतात विहीर आहे.
विहिरीत पाणी आहे.
पाण्यात मासे आहेत.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment